Home > Political > सचिन वाझे प्रकरणी मिना जॉर्ज नावाच्या महिलेला अटक

सचिन वाझे प्रकरणी मिना जॉर्ज नावाच्या महिलेला अटक

सचिन वाझेचा ‘ब्लॅक मनी’ ‘व्हाइट’ करण्याचे काम ही महिला करत होती अशी NIA ला शंका

सचिन वाझे प्रकरणी मिना जॉर्ज नावाच्या महिलेला अटक
X

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि त्यानंतर झालेल्या मनुसख हिरेन हत्या प्रकरणात आता NIAने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. NIA ने विमानतळावरुन मिना जॉर्ज नावाच्या महिलेला अटक केली आहे. ही महिला मीरा रोड इथे राहते. तिला अटक केल्यानंतर NIAने तिच्या फ्लॅटवर तिची चौकशी केली. तिच्या चौकशीमधून याप्रकरणाशी संबंधित आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. सचिन वाझेचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम ही महिला करत होती अशी शंका आहे.

या महिलेकडे NIA ला दोन ओळखपत्र सापडली आहेत. याच महिलेकडे नोटा मोजण्याचे मशीन देखील आढळले आहे. सचिन वाझेला अटक केल्यानंतर NIAने वाझे वापरत असलेल्या काही गाड्यादेखील ताब्यात घेतल्या आहेत. यातील एका आलीशान गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आणि पैसे मोजण्याचे मशीन देखील आढळले आहे. स्फोटकं ठेवण्याआधी काही दिवस सचिन वाझे एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिला होता आणि त्याला भेटायला तिथे एक महिला आली होती, असेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. आता त्याला भेटायला येणारी महिला हीच होती का याचीही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Updated : 2 April 2021 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top