Home > Political > "पुन्हा आले पण फाैजदाराचा हवालदार.." समाजमाध्यमांवर मिम्सचा पाऊस

"पुन्हा आले पण फाैजदाराचा हवालदार.." समाजमाध्यमांवर मिम्सचा पाऊस

पुन्हा आले पण फाैजदाराचा हवालदार.. समाजमाध्यमांवर मिम्सचा पाऊस
X

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल संध्याकाळी शपथ घेतली. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले होते. या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे गुवाहाटी वरून काल गोव्याला आणि गोव्यावरून थेट ते आज मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा देत असून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील व मी स्वतः कोणताही पदभार स्वीकारणार नाही असं जाहीर केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. संध्याकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आणि या वेळी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच शपथ घेतली. अशा या सगळ्या नाट्यमय प्रसंगानंतर आता समाज माध्यमांवर अनेक मीन्स सध्या व्हायरल होत आहेत. मागच्या अनेक दिवसांपासून देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र अचानक काय झाले? मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवेन्द्र फडणवीस पक्ष श्रेष्ठींवर नाराज आहेत? अशा अनेक चर्चा आता सुरू आहेत. या सगळ्या चर्चांसोबत फडणवीस यांची अनेक मिम्स पण व्हायरल होत आहेत. "मी पुन्हा येईन.." हा डायलॉग आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालतो आहे..

काय मिम्स व्हायरलं होतं आहेत पहा..













इतकंच नाही तर त्याचा "मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल" वाला व्हिडिओ देखील पुन्हा व्हायरल होतो आहे. त्यामुळे तुम्ही समाजमाध्यमांवर गेलात की तुम्हाला असे अनेक मिम्स पाहायला मिळतील..


Updated : 1 July 2022 7:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top