Home > Political > #ED भाजपला सुषमा अंधारेंचा फिल्मीस्टाईल टोला

#ED भाजपला सुषमा अंधारेंचा फिल्मीस्टाईल टोला

#ED भाजपला सुषमा अंधारेंचा फिल्मीस्टाईल टोला
X

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवर ED ची कारवाई झाली आहे .सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर EDने कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी सकाळी सकाळी दाखल झाले आहेत. पत्रावाला चाळप्रकरणी राऊत यांच्याविरोधात सध्या ईडी कारवाई करत आहे.

संजय राऊत यांनी "कोणत्याही घोटाळ्याशी माझंही संबंध नाही आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन मी सांगत आहे ,शिवसेनेसाठी नेहमी लढत राहीन "असं मत व्यक्त केलं होत.यावर शिवसेनेतील अनेक राजकीय नेत्यांनी संजय राऊत याना समर्थन दिले आहे.

दरम्यान शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ईडी बद्दल हटके अंदाजात आपलं मत व्यक्त केले आहे. "पहले जब कोई बच्चा रोता था, तो मां कहती थी , "चुप हो जा बेटा वरना गब्बर आ जाएगा"अब जब कोई सच कहता है, तो भाजपा कहती है, "चुप हो जा वरना ईड़ीवाला आ जाएगा..!"#इडित्कार असं ट्विट त्यांनी केलं आहे .

Updated : 31 July 2022 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top