Home > Political > ''कुत्री-मांजरं पाळली जातात..'' सुषमा अंधारे यांचा रामदास कदमांवर पलटवार | Marathi News

''कुत्री-मांजरं पाळली जातात..'' सुषमा अंधारे यांचा रामदास कदमांवर पलटवार | Marathi News

कुत्री-मांजरं पाळली जातात.. सुषमा अंधारे यांचा रामदास कदमांवर पलटवार | Marathi News
X

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shindde )यांची काल खेड या ठिकाणी मोठी सभा झाली. यापूर्वी ज्या मैदानात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची सभा झाली होती त्याच ठिकाणी त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत एकनाथ शिंदे व ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी प्रभुत्व असलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट रचला असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी गंभीरआरोप केले.. कदम यांच्या याच आरोपांना सुषमा अंधारे (uddhav thackeray latest marathi news ) यांनी उत्तर देतं त्यांच्यावर पलटवार केला आहे.

रामदास कदम काय म्हणाले होते.. (Ramdas Kadam latest marathi news)

खेड या ठिकाणी झालेल्या सभेत रामदास कदम म्हणाले होते की, योगेश कदम यांना कसं संपवायचं यासाठी ठाकरे गटाकडून षड्यंत्र रचले जात होते. तो बदमाश सुभाष देसाई यामध्ये सगळ्यात पुढे होता. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदम सारख्या वाघाला सांभाळायचे तुम्ही सुभाष देसाई यांच्यासारख्या शेळ्या मेंढ्यांना सांभाळत आहात हा तुमच्यातला फरक आहे..

कुत्री-मांजरं पाळली जातात वाघ नाही - सुषमा अंधारे

रामदास कदमांना उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे की, मला कळलंच नाही वाघ कसा पाळला जाईल, बरं कुत्री मांजरं पाळली जाऊ शकतात वाघ पाळला जात नाह. वाघ स्वतंत्र असतो त्याचा स्वतंत्र बाणा असतो. मला वाटतंय रामदास कदमांचं बोलण्यातलं म्हणजे त्यांना script देणार्यांनी दिली तर त्यांनी ती नीट वाचूनही बघितली नाही. त्यांना त्या शब्दांचे अर्थही कळले नाही आणि महत्वाचं म्हणजे वाघ मुळूमुळू कधीच रडत नसतो. एवढ्या आफत आल्या, इतके लोक सोडून गेले. एवढ्या सगळ्या लोकांनी वाट्टेल त्या पद्धतीने संकट आणली. ED, CBI, election commission, हजारो trollers एवढा रोज मारा होतोय. तरीसुद्धा न डगमगता, न खचता उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे अगदी जंग जंग पछाडत आहेत. ते झंडू बाम लावून रडत नाहीत. मग असला रडका वाघ कुठून आला बाबा? आम्हाला कळलं नाही ना.

Updated : 20 March 2023 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top