Home > Political > ''लहान लहान लेकरं..'' नितेश राणेंची सुषमा अंधारेंनी उडवली खिल्ली.. । Sushma Andhare on Nitesh Rane

''लहान लहान लेकरं..'' नितेश राणेंची सुषमा अंधारेंनी उडवली खिल्ली.. । Sushma Andhare on Nitesh Rane

लहान लहान लेकरं.. नितेश राणेंची सुषमा अंधारेंनी उडवली खिल्ली.. । Sushma Andhare on Nitesh Rane
X

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करेन असे अध्यक्ष यांनी जाहीर केले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून सभागृहात गोंधळ सुरुच होता. त्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहात संजय राऊतांच्या या विधानानंतर चांगलाच गदारोळ झाला यावेळी भाजपाचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane) यांनी सभागृहातच “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” अशी थेट धमकीच दिली. आता राणेंच्या या विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांना प्रतिउत्तर देताना, ''लहान लेकरावर मी रागवायला नको. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना बोलू द्या...'' त्यांची खिल्ली उडवली आहे.

सुषमा अंधारे काल वाशीम या ठिकाणी पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी बोलताना त्यांनी, “अडचण काय आहे माहीत आहे का? काही लेकरांना सतत लक्ष वेधून घ्यायची सवय असते. त्यामुळे नारायणरावांची जी बारकी बारकी लेकरं आहेत, त्यांची अडचण अशी झाली आहे की, भाजपा त्यांच्याकडे काहीही केल्याने लक्षच देत नाहीये. वाटतंय की या लहान लहान लेकरांवरती मी अजिबात रागवायला नको. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना बोलू द्या…'' असं म्हणत नितेश राणे यांची खिल्ली उडवली..

Updated : 2 March 2023 3:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top