Home > Political > सुजय विखे पाटलांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं भन्नाट उत्तर

सुजय विखे पाटलांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं भन्नाट उत्तर

सुजय विखे पाटलांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं भन्नाट उत्तर
X


सध्या संसदेत विविध मुद्यावरून गदोरोळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या वाढत्या महागाई विरोधात आता विरोधी पक्ष एकत्र होत आवाज उठवत आहेत. मोदी सरकारची वाढती महागाई पहाता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माणसाच्या मुलभूत गरजा अन्नधान्य देखील महाग होताना दिसत आहे. यावर सुप्रिया सुळे सोमवारी लोकसभेत "दत्त दत्ता, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दहीचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप" अशी मराठी कविता वाचून दाखवली. या कवितेतील केवळ दत्त आणि गाय सोडली तर केंद्र सरकारने सर्व वस्तूंवर जीएसटी लावला आहे, अशी आक्रमक टीका सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केली.

सुप्रिया सुळे यांनी केलेला ह्या टीकेला भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की.. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दुधापासून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही, अशी बोचरी टीकाही सुजय विखे पाटलांनी केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी काही शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी स्मितहास्य करत "सुजय गोड मुलगा आहे, माझ्या त्याला शुभेच्छा आहेत" असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे .

Updated : 2 Aug 2022 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top