Home > Political > माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार; दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंच वक्तव्य

माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार; दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंच वक्तव्य

माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार; दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंच वक्तव्य
X

राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 'रंगलेल्या गालाचा' मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रतिउत्तर दिले जात आहे. तर यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि सुप्रिया सुळे यांनी खोचक उत्तर देत भाजपला टोला लगावला आहे.

प्रविण दरेकर यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर, मी याविषयी काहीही बोलणार नाही. माझ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

दरेकरांच्या विधानावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरेकर माफी मागा. नाही तर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

Updated : 14 Sep 2021 9:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top