Home > Political > सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात...बंडातात्या कराडकर यांचा आरोप

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात...बंडातात्या कराडकर यांचा आरोप

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात...बंडातात्या कराडकर यांचा आरोप
X

साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्य़ा विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा आरोप केला आहे. या शिवाय त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील टिका केली आहे.


काही दिवसांपुर्वी राज्य़ सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. साताऱ्यामध्ये वाईन विक्रीच्या विरोधात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले,´ "राज्यातील नेते आणि त्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावे देखील आहेत. सुप्रिया सुळे यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले तसेच नाचतानाचे फोटो देखील उपलब्ध आहेत. हे शोधले तर सापडतील" या शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ढवळा असून अजित पवार पोवळा असल्याची टीका बंडातात्यांनी यावेळी बोलताना केली आहे.

Updated : 2022-02-03T14:28:35+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top