Home > Political > "पुन्हा जर कोणत्या स्त्रीला हात लावला तर हात तोडून हातात देईन" सुप्रिया सुळे संतापल्या.....

"पुन्हा जर कोणत्या स्त्रीला हात लावला तर हात तोडून हातात देईन" सुप्रिया सुळे संतापल्या.....

पुन्हा जर कोणत्या स्त्रीला हात लावला तर हात तोडून हातात देईन सुप्रिया सुळे संतापल्या.....
X

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमस्थळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महागाईविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व येथे पार पडलेल्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्या महिलेला कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. त्यानंतर या ठिकाणी मोठा गोंधळ झाला. महिला कार्यकर्त्या वर हाती असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. "यापुढे महाराष्ट्रात कुठल्याही पुरुषाने कोणत्याही पक्षातल्या महिलेवर हात उगारला तर हात तोडुन हातात देइन" असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे..

"कुठल्याही महिलेला जर अशा प्रकारे अंगावर हात उचलला तर मी स्वतः तिथे जाईल आणि कोर्टात केस करीन आणि त्याचे हात तोडुन हातात देइन..काय लावलंय हे? या लोकांना घरातून बाहेर पडायचे वांदे होतील. कुठल्याही महिलेला थोडं काही बोललं तर तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण तीच महिला संकट काळात कणखर पणे उभी राहिलेली या भारताने पाहिलेली आहे. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. महिलांच्या अंगावर काल एकदा हात उगारला आहे आता पुन्हा उगारू नका. आम्ही खूप सहनशील आहोत मात्र काल खूप अति झालं."असं म्हणत महिलेवर हात उगरलेल्या प्रकरणावरून त्यांनी इशारा दिला आहे. काल त्या काल जळगाव इथे बोलतं होत्या.

Updated : 18 May 2022 5:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top