Home > Political > सुप्रिया सुळेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं, म्हणाल्या 'चित्रा वाघ यांचं कृत्य हास्यास्पद'

सुप्रिया सुळेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं, म्हणाल्या 'चित्रा वाघ यांचं कृत्य हास्यास्पद'

सुप्रिया सुळेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं, म्हणाल्या चित्रा वाघ यांचं कृत्य हास्यास्पद
X

"काही लोकांनी त्यांच्या वॉलवर काहीतरी लिहिलेलं आहे. या देशाच्या जगाच्या कुठल्याही कायद्यात किंवा नियमात ते बसत नाही. ट्रोलिंग हा वेगळा विषय आहे. केतकी चितळे यांना मी ओळखत नाही. कायदा त्याच काम करेल. त्यांचं जे मत आहे ते यंत्रणेसोबतचं आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही" असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी केतकी चितळे यांनी केलेल्या पोस्टवर आपली प्रतिकिया दिली आहे. आज त्या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

यापुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कुणाच्याही वडिलांवर, व्यक्तींवर त्यांनी मरावं असं कोणी बोलतं?, हे कुठल्या संस्कृतीत बसतं. मी यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जाहीर आभार मानते. आपण अशा प्रकरणांमध्ये अशीच भूमिका कायम ठेवू. ही वेळ दुसऱ्या कुणावर आली तर मी सर्व प्रथम भूमिका घेईन असं देखील सुळें म्हणाल्या.

बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यावर देखील निशाणा साधला. चित्रा वाघ यांच्या विषयी बोलताना सुळे म्हणाल्या, आपल्या देशात एक यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहे तिथं जाऊन न्याय मागावा. माध्यमांचा गैरवापर अशा गोष्टींसाठी करणं हास्यास्पद आल्याच त्या म्हणाल्या. या सगळ्या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी आज एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी केतकी चितळे यांना अटक झाली. पण समाजमाध्यमांवर अश्लील कमेंट केलेल्या लोकांना अटक कधी होणार असा त्यांनी एक प्रश्न केला होता. यावरून सुळे यांनी वाघ यांना सुनावलं आहे.

Updated : 15 May 2022 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top