Home > Political > ड्रामा बंद करा नवनीत राणा : रूपाली चाकणकर

ड्रामा बंद करा नवनीत राणा : रूपाली चाकणकर

“सुशांत सिंहच आत्महत्या प्रकरणावेळी राज्यात थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नवनीत राणा दिपालीचा छळ होताना मुग गिळून गप्प का बसल्या?” रुपाली चाकणकरांचा थेट सवाल

ड्रामा बंद करा नवनीत राणा : रूपाली चाकणकर
X

सध्या राजभरात चर्चेत असलेल्या वन रक्षक अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. मृत वन रक्षक अधिकारी दिपाली चव्हाण यांना गेल्या काही काळापासून त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्रास देत होते, त्यांना रात्री अपरात्री भेटायला बोलवायचे, त्याचबरोबर दिपाली या गरोदर असताना त्यांना बळजबरी ट्रेकींगला घेऊन गेले होते, ज्यामुळे त्यांचा गर्भपात झाला होता. या सगळ्या छळाबद्दल दिपाली यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही त्यांना दाद मिळाली नाही. त्यांनी या छळाबद्दल खासदार नवनीत राणा यांनाही माहिती दिली होती. पण नवनीत राणा यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले.

दिपाली यांनी आत्महत्या करतेवेळी लिहीलेल्या शेवटच्या पत्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्याच बरोबर दिपाली यांनी त्यांच्या पत्रात विवाहित महिलेने किंवा मुलींनीही नोकरदार म्हणून कधी काम करू नये असं म्हटलं आहे. यावरून दिपाली यांना त्यांच्या वरिष्ठांनी किती खालच्या पातळीवर जाऊन त्रास दिला असेल याची कल्पना येते. दिपाली यांनी त्यांच्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार DCF विनोद शिवकुमार याला धरले आहे. याच शिवकुमारने त्यांना इतकं टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

शिवकुमार याला अटक झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे धाव घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवनीत राणा यांच्या समोर शिवकुमारची समर्थक म्हणून उभी असलेली तरूणी एका फोटोत नवनीत राणांची समर्थक असल्याचं दिसून येत आहे.

नवनीत राणा यांनी शेअर केलेला व्हिडीओ..

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक फोटो ट्विट करत नवनीत राणांचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. नवनीत राणा यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोकांनी नवनीत राणा यांना चांगलेच फटकारले आहे.

रुपाली चाकणकर यांचं ट्वीट..

रूपाली चाकणकर यांनी मॅक्स वूमनशी बोलताना नवनीत राणा यांना ड्रामेबाज म्हणत सुशांत सिंहसाठी राज्यात थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या नवनीत राणा दिपालीचा छळ होताना मुग गिळून गप्प का बसल्या होत्या असा घणाघात केला आहे. नवनीत राणा या सोयीचं राजकारण करतात, त्यांनी चित्रपटात केलेला अभिनय राजकारणात करू नये असंही त्या म्हणाल्या.

Updated : 30 March 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top