Home > Political > मनसेच्या रुपाली पाटील यांचा थेट नितीन गडकरींशी पंगा

मनसेच्या रुपाली पाटील यांचा थेट नितीन गडकरींशी पंगा

"फास्ट टॅग करूनही वेळ वाचणार नसेल तर तुमचा काय उपयोग? टोल नाक्यांवर लोकांची पिळवणूक थांबवा नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल!" मनसेच्या रुपाली पाटील यांचा थेट नितीन गडकरींशी पंगा

मनसेच्या रुपाली पाटील यांचा थेट नितीन गडकरींशी पंगा
X

आज पहाटे पासून देशातील सर्वच टोल नाक्यांवर FASTag च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र सर्वच वाहन धारकांकडे FASTag नसल्याने टोल नाक्यांवर काही किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. असंच काहीसं मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या सोबत घडलं.

पुण्यातील किणी टोल नाक्यावर रात्री गाड्यांच्या 7 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. या टोलनाक्यावर वाहन धारकांकडे FASTag नसल्याने त्यांच्याकडून दुप्पट दंड आकारला जात होता. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास रुपाली पाटील पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या त्यावेळी किणी टोल नाक्यावर ही वादावादी झाली. या संपूर्ण घटनेचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलं.

यावेळी रुपाली पाटील यांनी "टोल वर फास्ट टॅग वरून लोकांची पिळवणूक थांबवा, लाज वाटू द्या लोकांना सुविधा द्यायला आहात का मारायला? मी रुपाली पाटील वकील आहे. मला कायदे नको सांगु.. तिन मीनिटांच्या वर गाडी ठेवता येत नाही नियम माहिती आहेत का? फास्ट टॅग करून वेळ वाचतच नाही काय उपयोग मग तुमचा फास्ट टॅग करून? मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल!" असं म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. एनएचएआयने यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय दिला होता. नंतर ते दीड महिना वाढवण्यात आले. मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

Updated : 17 Feb 2021 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top