Home > Political > ST Worker Protest : "हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही" - पंकजा मुंडे

ST Worker Protest : "हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही" - पंकजा मुंडे

प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा किंवा सरकारमध्ये सामील करून घ्या, हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही.. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बाहेर येणं अपेक्षित नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे.

ST Worker Protest : हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही -  पंकजा मुंडे
X

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. या सगळ्यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा किंवा सरकारमध्ये सामील करून घ्या, हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही.. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बाहेर येणं अपेक्षित नसल्याची प्रतिकिया दिली आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या..

कर्मचाऱ्यांचा विषय सरकारने व्यवस्थित हाताळला नाही त्यामुळे आताची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढ्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर जाण्याची परिस्थिती आतापर्यंत कुठेही झालेली नाही. हे गंभीरतेनं घ्यायला हवं. महाराष्ट्रात अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न संबंधित मंत्र्यांनी हाताळणे आवश्यक होतं. प्रत्येक कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करा किंवा सरकारमध्ये सामील करून घ्या, हा विषय आपल्याला वाटतो तितका सोपा नाही.. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश बाहेर येणं अपेक्षित नव्हतं. त्यांचं आंदोलन शांतपणे सुरू होतं. त्यांचं किमान ऐकून घेण्यात विलंब झाला असेल असं पंकजा मुंडे यांनी म्हणलं आहे.

नुकतेच एसटी (st workers) कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपतय की काय असे वाटत असतानाच एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज एस टी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक (silver oak) या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. याठिकाणी चप्पल आणि दगडफेक सुरू झाली. कर्मचाऱी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Updated : 8 April 2022 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top