Top
Home > Political > राम प्रधान यांचं योगदान ऐतिहासिक – निलम गोऱ्हे

राम प्रधान यांचं योगदान ऐतिहासिक – निलम गोऱ्हे

राम प्रधान यांचं योगदान ऐतिहासिक – निलम गोऱ्हे
X

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. पहिल्याच दिवशी महत्वाची विधेयके सभागृहाच्या पटलावर ठेवल्यानंतर दिवंगत सदस्यांना श्रध्दांजलीचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, "राम प्रधान यांची प्रशासनाकडून राजकारणाकडे अशी वाटचाल दिसून येते. मुंबईवरील हल्ल्या नंतर राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. यातील अनेक मुद्द्यांची अम्मल बजावणी राज्य सरकारने केली. पण कालांतराने या समितीच्या मुद्द्यांवर सरकारने जे काम केलं त्यावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. या समितीचं एक ऐतीहासिक योगदान आहे." असं त्यांनी म्हटलं.Updated : 14 Dec 2020 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top