Home > Political > सोनिया गांधींना मोठा धक्का ?

सोनिया गांधींना मोठा धक्का ?

सोनिया गांधींना मोठा धक्का ?
X

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याद्वारे प्रचाराची तयारी केली आहे .सध्या काँग्रेसला पक्ष सांभाळण्याची वेळ आली आहे .गुजरात मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे . माजी मंत्री नरेश रावल आणि राज्यसभा खासदार राजू परमार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे .

त्यामुळे ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा असणार आहे .याआधी हार्दिक पटेल, जयराजसिंह परमार, केवल जोशियारा, इंद्रनील राजगुरू, श्वेता ब्रह्मभट्ट यांनी पक्ष सोडला आहे .त्यामुळे काँग्रेसला घर सांभाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान आम आदमी पक्षाने आपल्या१० उमेदवारांची घोषणा केली आहे .


Updated : 3 Aug 2022 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top