Home > Political > सोनिया गांधी आज ED समोर हजर राहणार नाहीत..!

सोनिया गांधी आज ED समोर हजर राहणार नाहीत..!

सोनिया गांधी आज ED समोर हजर राहणार नाहीत..!
X

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर होणार होत्या.
पण सोनिया गांधी आज ED समोर हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले होते.
या संदर्भात सोनिया गांधींनी आणखीन वेळ मागितला होता. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती.
अजून त्या कोरोनातून बऱ्या झालेल्या नसून गुरूवारी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते.
त्यांचा कोरोना अहवाल अद्याप निगेटिव्ह आलेला नाही. त्यामुळे त्या आज ED समोर हजर राहणार नसल्याचे म्हंटले जात आहे..


Updated : 8 Jun 2022 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top