Home > Political > "काही समाजकंटक माझ्या विरोधात षडयंत्र करत आहेत" चित्रा वाघ यांचा आरोप

"काही समाजकंटक माझ्या विरोधात षडयंत्र करत आहेत" चित्रा वाघ यांचा आरोप

काही समाजकंटक माझ्या विरोधात षडयंत्र करत आहेत चित्रा वाघ यांचा आरोप
X

महाराष्ट्रात एकीकडे अधिवेशन चालू असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत चित्रा वाघ यांनी "प्रत्येक महिलेला स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. आणि जर एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर कोणीतरी पुढे येणे गरजेचे आहे. तेच कार्य मी माझ्या सामाजिक जीवनात करत आले आहे."

"काही समाजकंटक माझ्या विरोधात षडयंत्र करत आहेत. मला कुठेतरी या सर्व लढ्यातून लांब करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच मी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सायबर सेलकडे आले आहे." असं चित्रा वाघ यांनी सांगीतलं.

Updated : 3 March 2021 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top