Home > Political > Video : भारती पवार यांचा साधेपणा; पहिल्यांदा कार्यालयात पाय ठेवण्यापूर्वी चप्पल काढली बाहेर

Video : भारती पवार यांचा साधेपणा; पहिल्यांदा कार्यालयात पाय ठेवण्यापूर्वी चप्पल काढली बाहेर

Video :  भारती पवार यांचा साधेपणा; पहिल्यांदा कार्यालयात पाय ठेवण्यापूर्वी चप्पल काढली बाहेर
X

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप खासदार भारती पवार ( bharati pawar ) यांना सुद्धा संधी मिळाली असून त्यांची आरोग्य राज्यमंत्री पदी वर्णी लागली आहे.त्यांनी गुरुवारी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला. मात्र याचवेळी त्यांचा आणखी एक साधेपणा पाहायला मिळाला, ज्यामुळे त्यांचं पुन्हा कौतुक होत आहे.

भारती पवार लोकसभेत बोलत असताना त्यांच्या पाठीमागे बसलेल्या भाजप खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे त्यांना हसत असल्याचा व्हिडीओ कालपासून व्हायरल होतोय. त्यामुळे सोशल मीडियावर भारती पवार यांच्याबद्दल लोकं भरभरून लिहत असून, त्यांचं कौतुक करत आहे.

त्यात आता भारती पवार यांचा पदभार घेण्यासाठी आपल्या कार्यलायत जात असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या पहिल्यांदा कार्यलायत पाय ठेवण्यापूर्वी आपल्या पायातील चप्पल बाहेर काढून ठेवतायत. त्यांच्या या साधेपणामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या असून, त्यांचं कौतुक होत आहे.

Updated : 9 July 2021 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top