Home > Political > सत्तेच्या माजातूनच किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला श्वेता महाले यांचा आरोप

सत्तेच्या माजातूनच किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला श्वेता महाले यांचा आरोप

सत्तेच्या माजातूनच किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला श्वेता महाले यांचा आरोप
X

भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेतील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यातच संजय राऊत यांच्या मित्रगटाचा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा असे ट्वीट सोमय्या यांनी केले होते. तर भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सोमय्या पुणे शहरात दाखल झाले होते. त्यावेळी पुणे महापालिकेच्या आवारात शिवसैनिकांनी सोमय्यांवर हल्ला करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. या सगळ्या प्रकारावरून भाजपा आमदार श्वेता महाले यांनी ''महाविकास आघाडी मधील नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. आणि त्याच माजातून किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला झाला'' असल्याची संतप्त प्रतिक्रिया मॅक्सवुमनशी बोलताना दिली.

किरीट सोमय्या पुणे महापालिकेच्या आवारात आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला या प्रकारावरून श्वेता महाले यांनी महाविकास आघाडीवर निशाण साधला आहे. ''महाविकास आघाडी मधील नेत्यांना सत्तेचा माज आला आहे. आणि त्याच माजातून किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला झाला असून कितीही हल्ले झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भ्रष्टाचार व जनतेच्या अन्यायाविरोधात उभा राहणारच. हा हल्ला किरीट सोमय्या यांच्यावरच झाला नसून जे कोणी महाविकास आघाडी सरकारमधील घोटाळे बाहेर काढत आहेत अशांवर झालेला हल्ला आहे किरीट भाईंवर झालेल्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते. अशी प्रतिक्रिया त्यांनी MaxWoman शी बोलताना दिली.


Updated : 5 Feb 2022 5:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top