Home > Political > "56 मी. CD.." पूजा चव्हाण प्रकरणावरून शिंदे गटातील संजय राठोड यांना शिवसैनिकांचा इशारा..

"56 मी. CD.." पूजा चव्हाण प्रकरणावरून शिंदे गटातील संजय राठोड यांना शिवसैनिकांचा इशारा..

56 मी. CD.. पूजा चव्हाण प्रकरणावरून शिंदे गटातील संजय राठोड यांना शिवसैनिकांचा इशारा..
X

मागच्या काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते. पूजा चव्हाण या मुलीने पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्ये प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप करत भाजपच्या चित्रा वाघ यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता. मागच्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पूजा चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचं म्हंटल आणि संजय राठोड यांना या प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण शिवसेना यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी संजय राठोड यांची 56 मिनिटाची सीडी आपल्याकडे आहे आणि त्यातून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील पुरावे सर्वांसमोर येतील असा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडात शिंदे यांच्यासोबत 40 हून अधिक आमदार सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडत हे बंड केलं आणि थेट शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. राज्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडा विरोधात निदर्शने होत आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी शिंदे यांच्या समर्थनार्थ सुद्धा मोर्चे निघत आहेत. शिंदे यांनी केलेल्या या बंडात संजय राठोड हे देखील सहभागी आहेत. संजय राठोड या बंडा मध्ये सहभागी झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राठोड यांनी शिवसेना पक्षाची गद्दारी केली असं म्हणत ते संताप व्यक्त करत आहेत. संजय राठोड बंडखोर गटाला जाऊन मिळाले याच रागातून आता यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी त्यांना थेट इशारा देत पूजा चव्हाण प्रकरणातील 56 मिनिटाची सीडी आपल्याकडे असून या प्रकरणातील अनेक पुरावे समोर आणणार असल्याचं म्हंटल आहे. आता पुन्हा एकदा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळणार का? हे येत्या काळात समोर येईल..

Updated : 28 Jun 2022 5:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top