Home > Political > पत्रकं घरोघरी वाटणं हा मनसैनिकांसाठी मोठा ट्रॅप, दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

पत्रकं घरोघरी वाटणं हा मनसैनिकांसाठी मोठा ट्रॅप, दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

पत्रकं घरोघरी वाटणं हा मनसैनिकांसाठी मोठा ट्रॅप, दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत सर्व मनसैनिकांना घराघराच हे भोंग्यांविरूध्दच आंदोलन पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशावरच आता शिवसेनेच्या महिला नेत्या तसेच अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेमध्ये आपल्या भाषणात भोंग्यांविरोधातील आंदोलन हे अजूनही संपलेलं नाही. येत्या काही दिवसात एक पत्रक मी देईन ते घराघरात पोहोचवा आणि घराघरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोहोचवा असे आदेश देखील दिले. या दरम्यान त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीवर प्रतिक्रीया दिली. त्यावर बोलताना त्यांनी मराठी आणि उत्तर भारतीय वादामध्ये माझ्या माणसांवर केसेस दाखल करण्याचा विरोधकांचा ट्रॅप आहे असं वक्तव्य केलं. आणि या ट्रॅपमुळेच आपण अयोध्या दौरा रद्द केला असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत दिपाली सय्यद यांनी त्यांच्यावर टीका केली.

राज यांच्यावर टीका करताना, "पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेल मध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपुन बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला." अशा शब्दात टीका केली.

Updated : 22 May 2022 9:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top