Home > Political > "एका आमदारा वरून.." शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा..

"एका आमदारा वरून.." शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा..

देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी शिवसेनेला सुद्धा एक सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पत्राला शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी जशास तसे उत्तर दिले आहे...

एका आमदारा वरून.. शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा..
X

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून काल संध्याकाळी शपथ घेतली. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले होते. या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र एकनाथ शिंदे गुवाहाटी वरून काल गोव्याला आणि गोव्यावरून थेट ते आज मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आणि त्यानंतर या दोघांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा देत असून एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं. आणि यानुसार काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केला आहे. यासोबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा अभिनंदन करत एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेला सुद्धा एक सल्ला दिला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "ही बढ़ती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे."

राज ठाकरे यांनी केलेले या ट्विट नंतर आता शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्विट करत याला उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हंटले आहे की, "दुसर्यांच्या कर्तृत्वाचे धडे किती दिवस गिरवणार माननीय राजसाहेब कधीतरी १ आमदारा वरून तुमचा धनुष्यबाण २ आमदारावर पोहचवुन जनतेला दाखवुन द्या कि कर्तृत्व नक्की काय असते, नाहीतर सारखी दोरी मागे ओढावी लागते हे बरे नव्हे!"

राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हंटल आहे वाचा....

उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो....

तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत, पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!

आता जरा आपल्यासाठी

ही बढ़ती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.

ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांग की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्य दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा

एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थ

पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

आपला मित्र

राज ठाकरे

Updated : 1 July 2022 1:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top