Home > Political > ''तुम्हाला जायचं तर सरळ जा..'' शिवसेनेचा रामदास कदमांवर पलटवार..

''तुम्हाला जायचं तर सरळ जा..'' शिवसेनेचा रामदास कदमांवर पलटवार..

तुम्हाला जायचं तर सरळ जा.. शिवसेनेचा रामदास कदमांवर पलटवार..
X

रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन ढसाढसा रडत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राष्ट्रवादी सोडावी इतकीच आमदारांची मागणी होती पण उद्धव ठाकरेंनी ते ऐकलं नाही. किती लोकांची हकालपट्टी करणार आहेत? हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या कडेला आसनारे शिवसैनिक आहेत की पवारांची माणसे आहेत ते पहा अशी टीका उद्धव ठाकरेंवर करत त्यांनी आदित्य ठाकरेंना सुद्धा आम्हाला साहेब म्हणावे लागत असल्याची खंत बोलून दाखवली. आता त्यांनी केलेल्या या टीकेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. ''जायचं असेल तर सरळ जा उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करू नका'' असं म्हणत त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या आहेत किशोरी पेडणेकर..

रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर एका विडिओ द्वारे किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदमांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हंटल आहे की, काल पर्यंत मुलं कुठे जायची तिथे जाऊदेत मी शिवसेनेत राहणार, आम्ही मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असं तुम्ही म्हणत होता आज तुम्हीच हे करताय. असं करू नका याचा सगळ्या शिवसैनिकांना राग येतो आहे. रामदास कदम यांना आम्ही भाई म्हणायचो. पक्षात आल्यापासून ते नेहमी मोठ्या पदावर राहिले आहेत. पण भाई काय केलं तुम्ही.. भाई असं नका करू निष्टवंत म्हणून आम्ही कोणाकडे बघायचं? बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी तुंम्हाला जी पदे दिली त्याचा मान राखत सर्वानीच कामे केली. आदित्य ठाकरेंना साहेब म्हणायचं नसेल तर नका म्हणू, त्यांनी कधीच म्हंटल नाही मला साहेब म्हणा म्हणून.. शिवसैनिक म्हणून आदित्य तुमच्याकडून पण खूप काही शिकले. तुम्हाला जायचं तर सरळ जा.. असं म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated : 19 July 2022 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top