Home > Political > भाजपवाले इतरांचे उमेदवार चोरून किती दिवस पक्ष चालवणार?: मनीषा कायंदे

भाजपवाले इतरांचे उमेदवार चोरून किती दिवस पक्ष चालवणार?: मनीषा कायंदे

भाजपवाले इतरांचे उमेदवार चोरून किती दिवस पक्ष चालवणार?: मनीषा कायंदे
X

देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव नांदेड जिल्ह्यातील देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा यामध्ये समावेश आहे. तर या जागेसाठी भाजपकडून शिवसेनेचे सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. तर इतरांचे उमेदवार चोरून किती दिवस पक्षाचा चालवणार आहात, असा खोचक टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

भाजपवर टीका करतांना मनीषा कायंदे म्हणाल्यात की, "देगलूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. आतापर्यंत या मतदारसंघात फक्त कॉंग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजप आमिष दाखवून आपल्याकडून उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतायत, पण एवढा मोठा पक्ष असलेला भाजप अजून किती दिवस इतरांचे उमेदवार चोरून किती दिवस पक्षाचा चालवणार आहात असा टोला मनीषा कायंदे यांनी यावेळी लगावला.

देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाविकास आघडीकडून ही जागा कॉंग्रेस लढवणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले नेते भाजपकडे जाऊ शकतात अशी चर्चा आहे. पण पोटनिवडणुक बिनविरोध लढवण्याची आतापर्यंतची महराष्ट्राच्या राजकारणात परंपरा आहे, त्यांमुळे ऐनवेळी भाजपकडून माघार घेण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.

Updated : 2021-10-02T14:08:07+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top