Home > Political > राज ठाकरेंना उंदीर म्हंटल्याने शिवसैनिक भडकले..

राज ठाकरेंना उंदीर म्हंटल्याने शिवसैनिक भडकले..

राज ठाकरेंना उंदीर म्हंटल्याने शिवसैनिक भडकले..
X

भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी "राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत असं वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी -अयोध्या पौळ पाटील यांनी राज ठाकरे यांची बाजू घेत एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हंटल आहे की, "महाराष्ट्राबाहेरील कोणीतरी तीनपाट व्यक्ती राज साहेबांना "चुहा" म्हणत असेल तर एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून मला ते अपमानास्पदच वाटते." मनसे आणि शिवसेना या दोघांमधील राजकीय वादाने पेट घेतला असताना पोळ यांनी केलेल्या या ट्विट मुळे त्या सध्या चर्चेत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या दौर्‍यासाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरू असली तरी दुसरीकडे त्यांचा हा दौरा रोखण्यासाठी भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी सुद्धा जोरदार तयारी केली आहे.

राज ठाकरे 5 जूनला आयोध्याला जाणार आहेत. एकीकडे महाराष्ट्रात मनसे-भाजप युती होणार का अशी चर्चा सुरू असली किंवा मनसे बाबत भाजपचे नेते गोडवे गात असले तरी उत्तर प्रदेशातील भाजप खासदाराने मात्र राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी "राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत असं वक्तव्य केले . त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी ट्विट करतं म्हंटल आहे की, "आदरणीय राज ठाकरे साहेब हे #हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे पुतणे व आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे भाऊ आहेत, राजेसाहेब यांना त्यांच्या भावाचा आदर आहे की नाही ते माहीत नाही परंतु महाराष्ट्राबाहेरील कोणीतरी तीनपाट व्यक्ती राज साहेबांना "चुहा" म्हणत असेल तर एक महाराष्ट्रीयन म्हणून, #मराठी म्हणून मला ते अपमानास्पदच वाटते. राज साहेबांना आता तरी समजले असेल की ज्या भाजपच्या नावाचा ते उदोउदो करत होते त्याच भाजपच्या नेत्यानी राजेसाहेब यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढले आहेत ते. असो.....

Updated : 11 May 2022 6:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top