Home > Political > शरद पवारांनी केलं संजय राऊत यांच्या वक्तव्याच समर्थन?

शरद पवारांनी केलं संजय राऊत यांच्या वक्तव्याच समर्थन?

शरद पवारांनी केलं संजय राऊत यांच्या वक्तव्याच समर्थन?
X

संजय राऊत यांनी दुपारी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्याची फोड करून शरद पवार सांगताना दिसले.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामध्ये शामिल न होता पळून येणारे आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद आज दुपारी वर्षा बंगल्यावर घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदे दरम्यान संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या 24 तासात आसाम मधून नाही तर इथे मुंबईत येऊन सांगा शिवसेना लगेच महाविकास आघाडीतून बाहेर पडेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ने आपल्या सर्व आमदारांची तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांच्या, महाविकास आघाडीचा प्रयोग अडीच वर्षात फसताना दिसतोय का या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षात राज्य सरकारने ज्या पद्धतीने एकत्रित रित्या काम केलं आहे. आघाडी सरकारने कोरोना काळात ज्या पद्धतीने काम केलं आहे त्यानंतर तरी हा प्रयोग फसला असं वाटत असेल तर ते आपलं राजकीय अनाकलन आहे असं म्हणावं लागेल."

याशिवाय हे सरकार अल्पमतामध्ये आहे की नाही हे ठरवण्यासाठी विधानसभा आहे. तिथे जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा कळेल की हे सरकार स्थिर आहे की अस्थिर त्यामुळे त्यावर आत्ताच बोलणं योग्य ठरणार नाही. अशा प्रकारच्या परिस्थिती मी याआधीही पहिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार मजबूत आहस आणि ते संपूर्ण देशाला कळेल.

संजय राऊत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, "मी संजय राऊत यांचं वक्तव्य ऐकलं आहे. बंडखोर आमदार असं म्हणतायत की आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत राहायचं नाही. यावर बोलताना संजय राऊत हे म्हणाले आहेत की 24 तासाच्या आत सर्व बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन सांगावं शिवसेना आता महाविकास आघाडीतून बाहेर पडेल पण हे तुम्ही इथे मुंबईत येऊन सांगायचं आसाम मध्ये बसून नाही आणि हीच गोष्ट काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितली."

आमदार आणि मंत्री अचानक निघून गेले यात गृह मंत्रालयाच फेल्युअर नाही आहे का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की आता कुणाचंही फेल्युअर मोजत बसण्याची वेळ नाहीये. मी एकनाथ शिंदे हांचा एक व्हिडिओ पाहिला त्यात त्यांना एक राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा असल्याचं स्पष्टपणे सांगत आहेत असं दिसतंय. मग मला सांगा CPI, राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पार्टी हे राष्ट्रीय पक्ष तर या सगळ्यांना पाठिंबा देणार नाही मग उरलं कोण? शिवाय हे सगळे आमदार ज्या राज्यांमध्ये लपून बसले आहेत त्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे? मग याना कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे हे कळण्या इतपत आपण सुज्ञ आहात. शिवाय या सर्व आमदारांना त्यांनी जे केलय त्या सगळ्याची किंमत मोजावी लागेल असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

Updated : 23 Jun 2022 4:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top