Home > Political > धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण : शरद पवार म्हणतात "आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही"

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण : शरद पवार म्हणतात "आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही"

“धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. चौकशी होऊ द्या. दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे," असं शरद पवार यांनी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण : शरद पवार म्हणतात आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही
X

संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी पणजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं.

यावर पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. या प्रकरणी चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे. काही जणांसाठी बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे." असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

Updated : 21 Jan 2021 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top