Home > Political > ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार? शरद पवारांचं मोठं भाकीत

ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार? शरद पवारांचं मोठं भाकीत

पाच राज्यांमध्ये कोण मारणार बाजी, ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार? राजकारणातील चाणक्य शरद पवारांचं मत काय? पाहा

ममता बॅनर्जी जिंकणार की हरणार?  शरद पवारांचं मोठं भाकीत
X

आज शरद पवार यांनी राष्ट्रीय प्रश्नावर पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी देशात होणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकासंदर्भात नक्की जनतेचा कल काय आहे. याबाबत भाष्य केलं. देशात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेश येथे निवडणूका होत आहे.

केरळ...

केरळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. आज राज्य त्यांच्या हातात आहे. या राज्यात आम्हाला क्लिअर कट बहुमत मिळेल यामध्ये शंका नाही.

तामिळनाडू...

तामिळनाडूची आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलीन डीएमके यांच्या बाजूनं आहे. ते उद्या राज्याचं सूत्र हातामध्ये घेतील. आणि लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठींबा देतील.

पश्चिम बंगाल

केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा गैरवापर करुन त्या ठिकाणी एक भगीनी आपल्या राज्यातील लोकांच्यासाठी संघर्ष करत आहे. तिच्यावर सगळ्यांनी एक प्रकारचा राजकीय हल्ला करण्याचा त्या संबंधीची भूमिका घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी असतात. बंगाली संस्कृतीवर कोणी आघात केला तर सर्व राज्य एकत्र होतं. त्यामुळं कोणी काही म्हणत असलं तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार येईल याची मला खात्री आहे.

आसाम...

आसाममध्ये भाजपची स्थिती तुलनात्मक दृष्टया चांगली आहे. म्हणजे एका ठिकाणी भाजपची सत्ता येईल. इतर राज्यात भाजपचा पराभव होईल. हा नवीन ट्रेंड देशाला दिशा देईल. असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 14 March 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top