Home > Political > 'देवाच्या काठीला आवाज नसतो',शालिनीताई पाटील यांची अजित पवारांवर टीका

'देवाच्या काठीला आवाज नसतो',शालिनीताई पाटील यांची अजित पवारांवर टीका

देवाच्या काठीला आवाज नसतो,शालिनीताई पाटील यांची अजित पवारांवर टीका
X

मुंबई: महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई करत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त केला आहे. यावर जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी प्रतिक्रिया देताना 'देवाच्या काठीला आवाज नसतो', असा खोचक टोला अजित पवारांना लगावला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शालिनीताई म्हणाल्या की, अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावला, मात्र 'देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच', असं शालिनीताई म्हणाल्या.

"वास्तविक पाहता २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. तसेच २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी मान्य केलं. त्यामुळे थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. तसेच २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे," अशी भावना शालिनीताई यांनी यावेळी व्यक्त केली.

Updated : 2 July 2021 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top