Home > Political > हिंदुत्वावरून शालिनी ठाकरेंची उद्धाव ठाकरेंवर बोचरी टीका

हिंदुत्वावरून शालिनी ठाकरेंची उद्धाव ठाकरेंवर बोचरी टीका

हिंदुत्वावरून शालिनी ठाकरेंची उद्धाव ठाकरेंवर बोचरी टीका
X

गेल्या महिनाभरापासून मनसेने भोंग्यांचा विषय उचलून धरला आहे. १ मेला औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केलं. या भाषणात त्यांनी राज्य सरकारला ३ ममे नंतर सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्याचा अल्टीमेटम दिला होता. यानंतर बुधवारी राज्यभरामध्ये मनसैनिकांनी अजानविरूध्द हनुमान चालिसा असं आंदोलन केलं. या सगळ्यावर आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला अध्यक्ष शालिनी ठाकरे यांच्याशी बातचित केली. त्यावेळी आम्ही राज ठाकरे दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत का? असा थेट प्रश्न शालिनी ठाकरे यांना विचारला. आणि त्यांनी देखील तितक्याच स्पष्टपणे या प्रश्नाचे उत्तर दिलं. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की,सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ते या प्रश्नाला असा रंग देतायत. पहिल्या दिवसापासून राज ठाकरे सांगत आहेत की हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. ते फक्त मशिदीवरील नाही तर सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवायला सांगत असून यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नसल्याचं त्या म्हणाल्या व पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वावरून टीका केली

यापुढे बोलताना त्या म्हणाल्या, राज ठाकरे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करायला सांगत आहेत. इतका साधा हा विषय आहे. पण जाणूनबुजून याला एक धार्मिक रंग दिला जातोय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेचं हिंदुत्व हे कधीच मागे पडलंय. आघाडीतील इतर दोन पक्षांना पटत नसल्यामुळे त्यांना जबरदस्तीने ते बाजूला ठेवावं लागलंय. त्यांना वाटतंय की धार्मिक रंग देऊन तणाव वाढला की खापर मनसेवर फुटेल पण मला असं वाटतंय की लोकांना मुळ मुद्दा कळाला आहे. ज्याप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय, सकाळची अजान कायद्याप्रमाणे झाली त्यावरून एकच म्हणावं लागेल की ज्यांना हा विषय समजतोय ते कायद्याचं पालन करतायत.

औरंगाबाद सभेत राज ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अजाण सुरू झाला आणि राज ठाकरे यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले. यावरून देखील आम्ही शालिनी ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, पहिला मुद्दा असा की जेव्हा ती अजान वाजली ती त्या अजानची वेळच नव्हती. ती अजान ही ८.१७ ला होणं अपेक्षित होतं पण ती झाली ८.४५ ला त्यामुळे ती वेळ नव्हती अजान वाजवण्याची. राज ठाकरे हे अधिकृत आणि कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करतात. गेल्या काही महिन्यांपासून जे नेते महिलांबद्दल वाईट वक्तव्य करतायत, कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करतायत त्यांच्या विरोधात माध्यमं ब्र देखील काढत नाहीत. पुढच्या पिढीला हे असे राजकीय नेते लाभलेत जे शिवराळ भाषा सर्रास वापरतात. मला कुणाचंही नाव घेउन त्यांना मोठं करायचं नाहीये. त्यामुळे मला नाही वाटत की राज ठाकरेंनी अशी कोणती भाषा वापरली आहे. सभेच्या वेळी मुद्दाम अजान वाजवली गेली आणि त्यामुळे राज ठाकरेंनी पोलिसांनी ती अजान थांबवण्याची विनंती केली. राज ठाकरेंनी त्यांची भुमिका ही पुर्वीपासूनच स्पष्ट केली आहे. राज साहेबांनी दिलेला अल्टीमेटम पोलिसांनी आणि सरकारने गांभिर्याने घ्यावा म्हणून त्यांनी ती भाषा वापरली आल्याच शकिनी ठाकरे यांनी मॅक्सवुमनशी बोलताना म्हंटल आहे.

Updated : 6 May 2022 2:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top