Home > Political > शिंदे-फडणवीसांवर मनसेची टीका..

शिंदे-फडणवीसांवर मनसेची टीका..

शिंदे-फडणवीसांवर मनसेची टीका..
X

घरात झालेल्या वादानंतर बाहेर पडलेल्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या कन्हाळमोह जंगलात तीन ते चार जणांनी पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर निर्वस्त्र आणि बेशुद्ध अवस्थेत तिला तिथेच सोडून आरोपी पळून गेले. सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. आता या प्रकरणानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही शालिनी ठाकरे यांनी, "राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करताना महिलांची आठवण येत नाही का?" असा प्रश्न उपस्थित करतं शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. या विस्तारानंतर शालिनी ठाकरे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, इतक्या महिला आमदार असताना देखील सरकारला एक महिला मंत्री सापडत नाही? महिला आमदारांमध्ये एक सक्षम महिला मिळत नाही का? असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. इतकच नाही तर त्यांनी या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारवर देखील जोरदार घनाघाट केला आहे. केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थिनी महिलांना आकर्षित करण्यासाठी फक्त योजना जाहीर केल्या जातात. बलात्काऱ्यांवर धाक निर्माण करण्यासाठी शक्ती कायदा निर्माण करणार असं फक्त सांगितलं जातं पण आजही हा कायदा केंद्राच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

Updated : 10 Aug 2022 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top