Home > Political > 'रक्ताने ज्यांचे हात माखले ते काय न्याय देणार; केंद्रीय मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे'

'रक्ताने ज्यांचे हात माखले ते काय न्याय देणार; केंद्रीय मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे'

रक्ताने ज्यांचे हात माखले ते काय न्याय देणार; केंद्रीय मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे
X

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत 36 जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. यावरूनच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी भाजप सरकारवर हल्ला हल्ला चढवला आहे. चाकणकर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, 'देशाच्या मंत्रिमंडळातील 42% मंत्र्यांवर खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारांच्या शासनात आपण कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. जिनके हाथ खून से रंगे हो, वो क्या इंसाफ देंगे आपको...?,'असा खोचक टोला चाकणकर यांनी मोदी सरकारला लावला आहे.बर्‍याच दिवसांपासून उत्तरप्रदेश (uttar pradesh ) येथे 'हिंसाचाराचे राज्य' सुरु आहे, भरदिवसा आमच्या माता-भगिनींचा रस्त्यांवर अपमान केला जात आहे. परंतु पंतप्रधान या विषयावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. त्यांच्यासाठी आमच्या माता-भगिनींच्या सन्मानापेक्षा निवडणुका ( Elections) जास्त महत्त्वाच्या आहेत, असा आरोप सुद्धा चाकणकर यांनी केला आहे.

Updated : 12 July 2021 6:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top