"माझा विनयभंग करण्यात आला" केतकी चितळेंचा गंभीर आरोप..
X
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळे यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर जवळपास त्या चाळीसहून अधिक दिवस पोलीस कोठडीत होत्या. त्यानंतर त्या आता बाहेर आल्या आहेत. केतकी चितळे यांनी फेसबुक वर शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्य पोस्ट शेअर केली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी न्युज 18 लोकमत या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्यावर विनयभंग झाला आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
केतकी चितळे यांनी या मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, ठाणे पोलीस मला घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या 20 एक बायकांचा मॉब होता. पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना मला या गर्दीतून जोरात कानाखाली वाजवण्यात आली. माझ्या डोक्यात देखील जोरात टफली मारण्यात आली. मला धक्का देण्यात आला. त्यावेळी मी साडी नेसली होती. बचाव करण्यासाठी मी पोलीस गाडीत जात असताना माझ्या पायात पाय घाल्यानंत आला व मी नंतर पोलिसांच्या गाडीत पडले देखील. यावेळी माझे कपडे देखील खेचण्यात आले. माझ्या साडीचा पदर खाली आला, साडी वर गेली होती. माझा विनयभंग होत होता हे घडत असताना माझ्यावर शाइफेक करण्यात आली. यावेळी या मॉबने पोलिसांना देखील मारहाण केल्याचा केतकी चितळे यांनी म्हटल आहे.