Home > Political > बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेलेल्या यामिनी जाधव कोण आहेत पहा..

बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेलेल्या यामिनी जाधव कोण आहेत पहा..

बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेलेल्या यामिनी जाधव कोण आहेत पहा..
X

शिवसेनेच्या यामिनी जाधव भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.१६ ऑगस्ट १९६७ चा त्यांचं जन्म आहे .शिवसेनेचे उपनेते आणि महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.२०१२ ला त्या बृहन्मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या . त्यांनतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एम आय एमच्या वारिस पठाण यांचा पराभव केला होता.सध्या त्यांच्यावर प्रतिज्ञापत्र चुकीची माहिती दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे 2019 निवडणूक निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी आपल्याकडे 7.5 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केलं होतं त्यामध्ये दोन तृतीयांश जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केलं होतं

हे ही वाचा

चार महिला आमदार एकनाथ शिंदे गटात सामील..

एकनाथ शिंदे गटात जसजसा वेळ जाईल तसतसे सामील होणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आत्ताच अपक्ष आमदार गीता जैन व किशोर जोरगेवार हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. हे दोन्ही आमदार आता एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीसच्यावर आमदारांनी बंड केल्यानंतर सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४०पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला आहे. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन गुहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केले आहे. टॉप शिंदे यांच्या बंधात तीन महिला आमदारांचा सहभाग होता आता अपक्ष आमदार गीता जैन या सुद्धा गुहाटी मध्ये दाखल झाल्या आहेत. त्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत किशोर जोरगेवार हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दसा वेळ जाईल तसे एकनाथ शिंदे गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या अधिक वाढू लागले आहे.

एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले आमदारांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत तीन महिला आमदार सुद्धा दिसत आहेत. फोटोमध्ये दिसत आहेत त्या प्रमाणे यामिनि जाधव, लता सोनवणे, किशोरी पाटील दिसत आहेत. त्यासोबतच आता अपक्ष आमदार गीता जैन या सुद्धा एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 40 हून अधिक आमदार असल्याचे दिसत आहे.

Updated : 24 Jun 2022 10:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top