Home > Political > संजय राऊतांच्या विधानाला सुषमा अंधारेंच समर्थन?

संजय राऊतांच्या विधानाला सुषमा अंधारेंच समर्थन?

संजय राऊतांच्या विधानाला सुषमा अंधारेंच समर्थन?
X

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केले होते. राऊतांच्या त्या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) तीव्र पडसाद उमटले. भाजप आणि शिवसेना गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे (Maharashtra Assembly Budget Session 2023). त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा घेतला त्यावर प्रतिकिया देताना संजय राऊत यांनी असं वक्तव्य केले होते.

काय म्हणाले होते संजय राऊत?

“आम्हाला ही जी बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट. चोरांच मंडळ. चोर मंडळ हे विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं तरी आम्ही काय पक्ष सोडणार आहोत का ? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी दिली. आम्ही ओवाळुन टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली पदं परत येतील. आमचा पक्ष महत्त्वाचा आहे”.

सुषमा अंधारेंच राऊतांच्या विधानाला समर्थन?

संजय राऊत यांच्या या विधानाचे समर्थ करता का? असा प्रश्न पत्रकाराने अंधारे यांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्या म्हणाल्या की, संजय राऊत चोर मंडळ म्हंटलेलं ज्या लोकांना झोंबलेलं आहे त्यात सगळे भाजपचेच का? हक्कभंगाचा प्रस्तावाची जेव्हा हे लोक भाषा करतात तेव्हा माझा प्रश्न आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना आहे की, भगतसिंग कोश्यारी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करत होते, मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड वक्तव्य करत होते तेव्हा साधा निंदाजनक प्रस्ताव देखील ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मांडला नाही, हक्कभंग प्रस्ताव तर लांबच.. त्यांना आज हक्कभंगाची आठवण कशी काय झाली? लोकांना देशद्रोही म्हटलेलं तुम्हाला चालतं, तेव्हा हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जात नाही. त्यामुळे मला वाटतं भाजपची ही विनाकारण चाललेली उर्फोड असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

कसब्यातील भाजपच्या पराभवावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) प्रतिष्ठेची केलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे आज निकाल समोर आले. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसाबा मतदार संघात भाजपचा पराभव झाला. एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा मोठा फटका बसला असताना चिंचवडमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. आता कसब्यात झालेल्या पराभवानंतर विरोधकांनी टोलेबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता, आज खरी शिवसेना महाविकासआघाडीबरोबर आहे त्यामुळे निर्णयही मविआच्या बाजूने आहे. असं म्हणत त्यांनी कसब्यातील भाजपच्या पराभवावर मत व्यक्त केले आहे. इतकाच नाही त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपाला आणखीन देखील टोले लगावले आहेत.

काल पिंपरी चिंचवड व कसबा पोटनिवडणुकांचे निकाल समोर आले. त्यानंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे वाशीम मध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी, लोक चिडलेले आहेत आणि जनमताचा कल आता महाविकास आघाडीच्या बाजूने होतं आहे हे स्पष्ट होतं आहे. जोपर्यंत खरी शिवसेना भाजपाबरोबर होती तोपर्यंत त्यांचा विजय होत होता. आज खरी शिवसेना महाविकासआघाडीबरोबर आहे त्यामुळे निर्णयही मविआच्या बाजूने असल्याचं त्यांनी म्हंटले आहे.

Updated : 3 March 2023 4:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top