Home > Political > "भाजप नावाचं वॉशिगं पॉवडर" संजय राऊत ED प्रकरणी आ. यशोमती ठाकूर यांचा टोला.

"भाजप नावाचं वॉशिगं पॉवडर" संजय राऊत ED प्रकरणी आ. यशोमती ठाकूर यांचा टोला.

भाजप नावाचं  वॉशिगं पॉवडर संजय राऊत ED प्रकरणी आ. यशोमती ठाकूर यांचा टोला.
X

राज्यातील अनेक राजकीय नेत्यांवर ED ची कारवाई झाली आहे .सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ED ने कारवाई केली आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी सकाळी सकाळी दाखल झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ED वर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अनेक शिवसैनिक हे त्यांच्या घराबाहेर थांबले आहेत. तर विरोधी पक्ष भाजपावर सडकून टीका कर आहे. केंद्रिय यंत्रणेचा वापर करत महाराष्ट्रात देखील दडपशाही , हिटलर शाही सुरू असल्याची माजी मंत्री काँग्रेसचे आ. यशोमती ठाकूर यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली आहे.

पत्रावाला चाळप्रकरणी राऊत यांच्याविरोधात सध्या ईडी कारवाई करत आहे. संजय राऊत यांनी "कोणत्याही घोटाळ्याशी माझंही संबंध नाही आणि बाळासाहेबांची शपथ घेऊन मी सांगत आहे ,शिवसेनेसाठी नेहमी लढत राहीन "असं मत व्यक्त केलं होत.यावर शिवसेनेतील अनेक राजकीय नेत्यांनी संजय राऊत याना समर्थन दिले आहे. संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर यशोमती ठाकूर म्हणाल्या देशात दडपशाही आहे हिटलर शाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या वर दबाब आणण्याच काम केलं जातं आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होत असल्याच देखील आ. ठाकूर यांनी सांगितलं त्या पुढे म्हणाल्या "भाजप नावाचं वॉशिगं पॉवडर आहे, त्यांच्या मध्ये सामिल झालं की साफ शुध्द होत". अशा प्रकाचा टोला यावेळी त्यांनी भाजपला लगावल आहे. संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर यशोमती ठाकूर आक्रमक अशी प्रतिक्रीया दिला आहे.

Updated : 2022-07-31T15:31:33+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top