Home > Political > संजय राऊत ईडी कारवाईवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

संजय राऊत ईडी कारवाईवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

संजय राऊत ईडी कारवाईवर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
X

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना EDने अटक केल्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. पण त्यांच्या या अटकेमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच आता संजय राऊत यांच्या अटकेचा मुद्दा संसदेत देखील शिवसेनेतर्फे मांडला जाणार आहे.

यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांना पाठिंबा दिला आहे. "मरेन पण शरण जाणार नाही असे स्वाभिमानी आणि पक्षासाठी नेहमी लढणारे निडर शिवसैनिक म्हणून आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत .त्याचबरोबर ईडी हि कारवाई सूडबुद्धीने करत आहे हे स्पष्ट आहे .पण याचा अर्थ आम्ही शांत बसू अशा अजिबात नाही. सनदशीर मार्गाने हि लढाई आम्ही लढू आणि ती जिंकू असा आम्हाला विश्वास आहे",असे मत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे .


Updated : 1 Aug 2022 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top