"म्हणून सांगतेय मुख्यमंत्री साहेब या घाणीला मंत्रीमंडळातून काढून टाका"
भाजपच्या चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
Max Woman | 26 Feb 2021 6:00 PM IST
X
X
पूजा चव्हाण प्रकऱणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली त्या दिवशी वनमंत्री संजय राठोड यांनी पूजाला ४५ फोन केले होते. अरुण राठोडने पोलिसांच्या १०१ या क्रमांकावरून तशी कबुलीही दिली होती, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच त्या दिवशी १०१ क्रमांकावरून झालेलं अरुण राठोडचं संभाषण जाहीर करून त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "आम्ही इतर कोणत्याही मंत्र्यांकडे न जाता मुख्यमंत्र्यांकडे जातोय. कारण, इतर सर्व मंत्री सारखेच आहेच 'चट्टे पट्टे' आहेत. मुख्यमंत्री तसे नाहीत. म्हणून सांगतेय मुख्यमंत्री साहेब या घाणीला मंत्रीमंडळातून काढून टाका."
Updated : 26 Feb 2021 6:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire