Home > Political > संजय राठोडांचा वाढदिवस... लोकं का करतायत चित्रा वाघ यांना टॅग!

संजय राठोडांचा वाढदिवस... लोकं का करतायत चित्रा वाघ यांना टॅग!

संजय राठोडांचा वाढदिवस... लोकं का करतायत चित्रा वाघ यांना टॅग!
X

संजय राठोड यांचा आज वाढदिवस आहे. समाजमाध्यमांवर त्यांचे अनेक सहकारी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण वाढदिवस जरी त्यांचा असला तरी चर्चेत मात्र चित्रा वाघ आहेत. संजय राठोड यांना शुभेच्छांचे जे काही मेसेज समाज माध्यमांवर आहेत ते जर पाहिले तर चित्रा वाघ का चर्चेत आहेत ? याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल..

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांना समाजमाध्यमांवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या या पोस्टवर आलेल्या कमेंट्स काही बघायलाच नको. प्रत्येक दोन कमेंट नंतर एका कमेंट मध्ये चित्रा वाघ यांना टॅग करण्यात आले आहे. आता हेच बघा ना, ट्विटर वापरकर्ते संदीप सोनवणे चित्रा वाघ यांना टॅग करत म्हणतायत की, अर्रर्रर्र चित्रा वाघ बघा हा तुमचा संजय राठोड नेता म्हणून कसा चमकतोय आत्ता खूपच खच्चीकरण होत असेल न 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 किती बे....... पणा तुमच्या नेत्यांनी करायला लावल मॅडम तुम्हाला.दीपक कागणे म्हणतायत, चित्रा वाघ ताई च्या संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑💕Maruti Nalmale (शिवसेना UBT) यांनी तर थेट चित्रा वाघ यांना प्रश्नच केला आहे. ते म्हणतायत की, पूजा चव्हाण प्रकरण कुठवर आलंय? चित्रा वाघ तुमच्या नेत्यांनी तर क्लीन चिट दिली, आता कसं?
सरकार नावाने ट्विटर हँडल असलेले म्हणतायत की, हे तेच का की बीजेपी आनी ख़ासकरुन चित्रा ताई ज्यांचा राज़ीनामा मागत होतात? आनी आता सहकारी मंत्री?🙄
अभिजीत या नावाने असलेल्या ट्विटर वापरकर्त्याने तर चित्रा वाघ यांना चांगलंच धारेवर धरले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या शुभेच्छांच्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांना टॅग करत त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही आणि चित्रा वाघ यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते आणि उद्धवजी ठाकरेंना ह्यांना निलंबित करायला लावले होते तस त्यांनी केलं देखील होते , मग आता ह्याच व्यक्तीला सहकारी म्हणायला काही वाटत नाही का?ह्याच अर्थ त्यांनी केलेल्या गुन्ह्याला तुमचा पाठिंबा आहे हे समजायचं का …


संजय राठोड व चित्रा वाघ वाद नक्की काय?

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एका तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले मंत्री संजय राठोड. याच संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जीवाचे रान केले होते. अखेर ठाकरेंना राठोड यांचा राजीनामा घ्याला लागला. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झालेल्या संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे. ज्यांच्यावर इतके टोकाचे आरोप केले त्यांच्यासोबतच आता मांडीला मंडी लावून बसण्याची वेळ भाजप व खासकरून चित्रा वाघ यांच्यावर आली होती. पण यावेळी एकनाथ शिंदे यांच्या या निर्णय़ावर चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय़ दुर्दैवी असल्याचं म्हणत आपण लढा सोडणार नाही असा इशारा दिला होता. आता त्या लढ्याचं पुढे काय झालं हे सर्वाना माहित आहेच. पण जनता हे विसरलेली नाही. संजय राठोड यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल वारंवार लोकांकडून चित्रा वाघ यांना प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज देखील हेच घडलं संजय राठोड यांच्या वाढदिवसा दिवशी समाज माध्यमांवर चित्रा वाघ या चर्चेत आहेत..

पूजा चव्हाण प्रकरण नक्की काय?


7 फेब्रुवारी 2021 रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका फ्लॅटच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून उडी मारुन आ त्म ह त्या केली होती. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर गंभीर आरोप करत तेच पूजाचे आत्महत्यास राठोड जबाबदार असल्याचे सांगत दोघांचे कथित फोन संभाषणाच्या ध्वनीफीत जाहीर केल्या होत्या. या प्रकरणानंतर महाविकास आघाडीचे मंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद गमावावे लागले होते.

Updated : 30 Jun 2023 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top