Home > Political > महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची धुरा संध्याताई सव्वालखे!

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची धुरा संध्याताई सव्वालखे!

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची धुरा संध्याताई सव्वालखे!
X

काँग्रेसमध्ये नव्या नियुक्त्यांची रेलचेल सुरूच...

अलिकडे काँग्रेस हायकमांड महाराष्ट्रात विषेश लक्ष घालताना दिसत आहे. काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्र काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम सुरू आहे. राज्यातील आगामी पालिका निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती केली आहे. सोनिया गांधी यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाचे सचिव आणि खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

गेल्याच महिन्यात मुंबई काँग्रेसची धुरा भाई जगताप यांच्या हातात दिल्यानंतर काँग्रेसमध्ये हा दुसरा मोठा बदल दिसत आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचं प्रदेशाध्यक्ष पद या आधी चारूलता टोकस यांच्याकडे होतं. मात्र पक्षवाढीच्या दृष्टीने आता हे पद संध्या सव्वालाखे यांना देण्यात आलं असल्याने भविष्यात याचा महाराष्ट्र काँग्रेसला याचा कितपत फायदा होतो हे पाहावं लागणार आहे.



Updated : 13 Jan 2021 12:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top