Home > Political > अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू?, सक्षणा सलगरांच राज ठाकरेंवर टीकास्त्र

अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू?, सक्षणा सलगरांच राज ठाकरेंवर टीकास्त्र

अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू?, सक्षणा सलगरांच राज ठाकरेंवर टीकास्त्र
X

सध्या राज्यभर राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा सुरू आहे. या मध्ये मंगळवारी रात्री इस्लामपूर येथे पक्षाची सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांनी राज ठाकरेंचा शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे खरपूस समाचार घेतला.

यावेळी त्या म्हणाल्या "जयंत पाटलांचे नाव ठेवून ज्यांना आपल्या भाषणाची उंची वाढवायची होती, त्या राज ठाकरेंना मला सांगायचंय जयंत पाटलांच्या नावात जय अस आहे परंतु राज ठाकरेंच्या पोटामध्ये जातीयतेचे आणि धर्माचे जंत वाढले आहेत म्हणून त्यांना जंत पाटील असं सुचलं असेल. जयंत पाटील काही पहिल्यांदा दुसऱ्यांदा आमदार झाले नाहीत. काही लोक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात पण जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. हजार आणि दोन हजार नाही तर 85 हजारांच्या फरकानं गुलाल उधळून ते विधानसभेत गेले आहेत

मुंबईमध्ये राज ठाकरे यांना सांगितलं पाहिजे आपण साधी प्रभागाची निवडणूक लढवत नाही. फक्त मुंबईत अवकाळी पावसा सारख्या एक दोन सभा घ्यायच्या इतकच आणि इथे शेतकरीवर्ग आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होतं तसं त्यांच्या सभेमुळे निश्चितपणे महाराष्ट्राचे नुकसान होते. राज ठाकरे यांच्या सभेमध्ये विकासाचे मुद्देच नसतात महागाई वर बोलत नाहीत, मुंबईच्या विकासावर देखील बोलत नाही, शेतीचा आणि राज ठाकरे यांचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगा, तुरीच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा असं म्हणणारे राज ठाकरे आहेत

राज ठाकरेंना शेतीवर बोलण्याचा अधिकारच नाही. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात शरद पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. त्यांना मी सांगू इच्छिते स्टेजवर जितेंद्र आव्हाड आहेत. वंजारी समाजाचा माणूस मुंबईत वाढतो काय, पक्षाचा झेंडा हातात घेतो काय, एका सामान्य कार्यकर्त्या पासून ते आमदार पर्यंत आणि तिथून आज गृहनिर्माण मंत्री असा असामान्य प्रवास त्यांनी केलाय. मुंब्रा कळवा मध्ये आरएसएसचे फिल्डिंग असतानादेखील हिंदू मुस्लिम जनता आव्हाड यांना भरघोस मतांनी निवडून देते.

आव्हाड यानंतर धनंजय मुंडे यांचे नाव घेऊ इच्छित आहे वंजारी समाजाचा माणूस पण शोषितांचा श्रमिकांचा आवाज असलेल्या या व्यक्तीची शरद पवार आणि अजित पवारांनी पारख केली आणि त्यांना विरोधी पक्ष नेता केले राज ठाकरे तुम्ही म्हणता आमचा पक्ष जातीयवादी आहे राज ठाकरे तुम्ही जातीवादी असल्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना मुंबई पुण्यामध्ये राजीनामे द्यावे लागतात. तुमची तपासणी करून द्या कोणीही उठावे आणि आमच्या पवार साहेबांवर बोलावं.

गुणरत्न सदावर्ते जेलची हवा खातोय. बसने महाराष्ट्र दर्शन सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पोलिसांचा मार खातय. पवार साहेबांच्या घरावर हल्ला घडवून आणला आणि तेही घरात शरद पवार आणि कुटुंबीय असताना... हिम्मतच कशी होते अशा विषाणूंना आपण कुठेतरी आवरलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने हे केलं पाहिजे पवार साहेब महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यावर तुम्ही हल्ला करताय.

राज ठाकरे आपल्याला मी एकच सांगते, "रफ्तार के लिए इजाजत की जरुरत नही होती और रोक सके राष्ट्रवादी को इतनी ताकत गिधाडो मे नही होती." राष्ट्रवादीची ताकद आहे म्हणून तिला टार्गेट करतात गुढीपाडव्याला आपण नव्या वर्षाची उत्कर्षाची समृद्धीची गुढी उभारतो राज ठाकरेंनी गुढी उभारली हिंदू आणि मुस्लिमांची भोंग्यांची?

राज ठाकरे यांनी पवारांवर टीका केली म्हणून त्यांना उत्तर द्यावे लागते आणि आता तुम्ही अयोध्येला जाताय का तर दुसरा मुद्दाच नाहीये हिंदू-मुस्लीम करायचं काही फरक पडत नाही तुम्ही अयोध्या ला जा नाहीतर दुसरीकडे कुठे ही पण मी एकच म्हणेन, "काय होतास तू काय झालास तू अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू"

रामदास आठवले राजू शेट्टी सगळे म्हणाले पवार जातीवादी नाही सत्ता असली की भाजपला कसंतरी होतं आणि आज तुम्हाला सत्ता हवी आणि तुम्हाला जातीय दंगली घडवायचं त्यांच्या मुलांचं काही जात नसतं त्यांना रेड कार्पेट असतो त्यामुळे कुणीही भोंगे लावायला जाऊ नका." असं आवाहन त्यांनी राज्यातील तरुणाईला केलं. त्यांच्या या भाषणाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राज ठाकरे आता सलगर यांच्या टिकेला काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 21 April 2022 6:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top