Home > Political > विकासाच्या मुद्द्यांवर रुपाली पाटील आक्रमक

विकासाच्या मुद्द्यांवर रुपाली पाटील आक्रमक

विकासाच्या मुद्द्यांवर रुपाली पाटील आक्रमक
X


अधिवेशनात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे . अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनंजय मुंडे ही तिकडे किती ओरडत होते. ते एवढ्या जोरात ओरडत होते की, जसे मूळचे शिवसैनिक वाटत होते. तुमचा घसा खराब होईपर्यंत ओरडला. तुमचा सर्व प्रवास मला माहिती आहे. त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, करुणा, दया दाखवली, त्यामुळं हे झालं.यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी तीव्र टीका केली आहे .

रुपाली ठोंबरे यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे कि,"काय दिवस आलेत महाराष्ट्राला मुख्यमंत्री साहेब आमदारांच्या संमतीच्या लफडे,अनौतिक संबंध यावर बोलतात काय सिद्ध करायचे आहे ,काय उद्दिष्ट्ये आहेत .व्यक्तिगत लफडयात ,अनैतिक संबंधात कोणता विकास साध्य करायचा आहे ? ते तर सांगा."अशा शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

"मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी प्रेम,करुणा,आस्था कष्ट करणाऱ्या माता भगिनी,कर्तृत्वान लेकीबाळी यांच्या दाखवली तर आम्ही आपले आजन्म ऋणात राहू.शेती प्रश्न,उद्योगधंदे,शिक्षण अनेक प्रश्न महत्वाचे प्रश्न आपल्या समोर आवासून आहेत."असही ट्विट रुपाली ठोंबरे यांनी केले आहे.

Updated : 23 Aug 2022 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top