Home > Political > '... केतकी चितळेला चोप देणार', रूपाली ठोंबरे आक्रमक!

'... केतकी चितळेला चोप देणार', रूपाली ठोंबरे आक्रमक!

... केतकी चितळेला चोप देणार, रूपाली ठोंबरे आक्रमक!
X

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता तिच्यावर चौफेर टीका करू लागले आहेत. इतकंच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रूपाली ठोंबरे पाटील यांनी तर केतकीवर कविता करत त्यातून चोप देण्याची धमकी दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या आहेत रूपाली ठोंबरे?

चि चि चवताळीस बाई तू

महिला असली तरी छपरीच तु,

संस्कार नसलेली केतकी,

इतकीशी कशी चवताळीस

हरामखोर विकृती,मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे.

कशात ना मशात केतकीबाई तमाशात ,

लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला ,मिळणारच बाई तुला चोप

#सडकी #केतकी #चितळे

केतकी चितळेनी पोस्ट केलेल्या वादग्रस्त कव्याला काव्यातुनच प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. रूपाली यांनी केतकी चितळेला संस्कारहीन सांगत चोप देण्याची धमकीच दिली आहे. सोबत चपलेचे १०० जोडे मारल्यावर १ जोडा मोजला पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

शुक्रवारी अभिनेत्री केतकी चितळेने एक वादग्रस्त पोस्ट केलीये. या वेळी तिने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणारी काव्यरचना पोस्ट केलीये. ही काव्यरचना तिने लिहीलेली नसुन कुणी ऍड. नितिन भावे यांनी लिहीली आहे.

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll

ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक

सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll

समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll

ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll

भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll

खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll

याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

काव्य रचना करणाऱ्या नितिन भावे यांनी यात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांप्रमाणे त्यांचंच नाव घेऊन सुरूवात केलीये. शब्दशः सार काढायला गेलो तर हा निघतो की, तुकाराम महाराज पावारांना सांगतात की तोंडाचा फवारा उडवू नको, आता या काव्य रचनेतील पवार कोण हे आपल्याला पुढील वर्णनावरून स्पष्ट होतं. तुर्तास पुढील ओळींचा अर्थ पाहुयात. वयाची ऐंशी ओलांडली आहे आता खुप जगलात नरक आपली वाट पाहत आहे. सारे शिलेदार पडले आता फक्त सुप्रिया सुळे आणि सतरा वेळा तोंडातून लाळ गळत असते.

शरद पवारांचा समर्थ रामदास स्वामींना असलेला विरोध जगजाहीर आहे त्यावरून बोलत समर्थ रासदास स्वामी हे शरद पवारांच्या बापाचेही बाप आहेत असं म्हटलं आहे. शरद पवार हे ब्राम्हणांचा मत्सर करतात म्हणुन त्यांची तुलना डासाशी केली गेली आहे. शरद पवार आपल्या पापांचा घडा भरला आहे गप्प बसा नाही तर राडा होईल असा धमकीवजा इशाराच देण्यात आला आहे. फुकटचा पैसा खाऊन पवारांचं तोंड हे वाकडं झालं असल्याचं म्हटलं आहे. शरद पवार हे लबाडांचे लबाड असल्याचं या अभंग रचनेत म्हटलं आहे.

हा वादग्रस्त अभंग पोस्ट करून अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेच पण तिच्यावर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चौफेर टीका करत आहेत. या सगळ्या टीका टिप्पणीला केतकी कशी सामोरी जाते आणि शरद पवार यावर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated : 14 May 2022 5:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top