Home > Political > नाव न घेता रूपाली ठोंबरेंचा सदावर्तेंना टोला..

नाव न घेता रूपाली ठोंबरेंचा सदावर्तेंना टोला..

नाव न घेता रूपाली ठोंबरेंचा सदावर्तेंना टोला..
X

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे या त्यांच्या रोखठोक वक्तव्य आणि अनोख्या आंदोलनांमुळं कायम चर्चेत असतात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अँड. गुणरत्न सदावर्ते हे सातत्यानं खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असतात. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिलं जातं. त्यात आता रूपाली ठोंबरेंनीही अँड. सदावर्तेंचं नाव न घेता मिश्कील टीका केलीय. ठोंबरे यांनी एक व्यंगचित्र फेसबूकवर पोस्ट केलंय. त्यातील व्यक्तिरेखा ही अँड. सदावर्ते यांच्याशी मिळतीजुळती असल्याचं दिसतं. या व्यंगचित्राचं हेडरचं आहे – डंके के चोट पे...अर्थात सदावर्ते यांच्या तोंडी हा डायलॉग अनेकवेळा सर्वांनी ऐकलाय. एका प्राण्याचं शरीर दाखवण्यात आलं असून त्याला सदावर्ते यांच्याशी मिळताजुळता चेहरा लावण्यात आलाय. त्यासमोर लिहिण्यात आलंय की, “ एवढे शिक्षण घेऊन सुद्धा ह्याचा ‘मेंदू’ रिकामाच...शंखपुष्पी घे जरा...

हेच व्यंगचित्र शेअर करतांना रूपाली ठोंबरे यांनी म्हटलंय की, “ ज्याने काढले, परफेक्ट काढले...पण शंखपुष्पी घेऊन सुद्धा हा माणूस, चांगल्या माणसा सारखा वागू शकत नाही... रूपाली ठोंबरेंच्या या पोस्टला नेटिझन्सनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


Updated : 27 Jun 2023 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top