Home > Political > "बेडकांनी कडेकडेने निघायचं.." नारायण राणेंना त्यांच्याच शब्दात उत्तर..

"बेडकांनी कडेकडेने निघायचं.." नारायण राणेंना त्यांच्याच शब्दात उत्तर..

बेडकांनी कडेकडेने निघायचं.. नारायण राणेंना त्यांच्याच शब्दात उत्तर..
X

राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर बोलताना शरद पवार यांनी धमकी दिली असे म्हणत नारायण राणे यांनी ट्वीट केले. त्यामध्ये राणे म्हणाले की, शरद पवार या सर्वांना धमक्या देत आहेत. 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, अशी धमकी नारायण राणे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर देतांना दिली. पण नारायण राणेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक झालेली पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी नारायन राणेंना घर न गाठू देण्याची धमकी देणाऱ्या बेडकांनी कडेकडेनेच निघायचं बरं. अस म्हणत उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी 'अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम काम केलं आहे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या राष्ट्रीय संकटावर मात करण्याचं काम केलं. हे सर्व पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान आहे. बंडखोर आमदारांना इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही. बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागेल'' असा इशारा त्यांनी दिला होता.

त्यांच्या या वक्तव्यावर नारायण राणे यांनी आमदारांना हात तर लावून दाखवा घरी जण अवघड होईल असं म्हणत उत्तर दिले होते. नारायण राणे यांनी शरद पवारांना यांना या शब्दात उत्तर दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी सुद्धा त्याच शब्दात उत्तर दिले आहे. त्यांनी फेसबुक वर शरद पवारांच्या भाषणातील, "दमदाटी करून राजकारण करणार्यांना त्यांची जागा दाखवली जाईल" असे शरद पवार म्हणत असलेला व्हिडिओ शेअर करत "घर न गाठू देण्याची धमकी देणाऱ्या बेडकांनी कडेकडेनेच निघायचं बरं. जय शिवराय,जय जिजाऊ,जय अहिल्यादेवी,जय झाशीची राणी,जय सवित्रीमाई,जय रमाई," अस म्हणत उत्तर दिले आहे.

Updated : 24 Jun 2022 2:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top