Home > Political > सूर्योदय होताच चित्रा वाघ यांचा चाळीस पैसे दराने टीका करण्यासाठी रेट सुरू होतो: रुपाली चाकणकरांची टीका

सूर्योदय होताच चित्रा वाघ यांचा चाळीस पैसे दराने टीका करण्यासाठी रेट सुरू होतो: रुपाली चाकणकरांची टीका

सूर्योदय होताच चित्रा वाघ यांचा चाळीस पैसे दराने टीका करण्यासाठी रेट सुरू होतो: रुपाली चाकणकरांची टीका
X

स्वतःच्या पक्षाच्या आमदारांचा गुन्हा पाठीशी घालणाऱ्यांना दर मिनिटाला खोटं बोलावं लागतंय, एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात...हि "मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरची "ची लक्षणं आहेत. हा आजार अतिशय भयानक आहे,चित्रा वाघ यांनी वेळीच तपासणी करून तब्येतीची काळजी घ्यावी अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे. त्या अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होत्या.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची देखील उपस्थिती होती.

दरम्यान, यावेळी रूपाली चाकणकर यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तर देताना चाकणकर यांनी वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.


Updated : 29 Sep 2021 1:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top