Home > Political > रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत...

रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत...

रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत...
X

राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज आता राजकीय विश्लेषक सुद्धा बांधू शकत नाही आहेत. राज्यात वारंवार राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारचे नवीन राजकीय नाट्य काल आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. आपणा सर्वांना माहित आहे तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. या महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होतात न होतात तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला व ९ लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांच्या निर्णयानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या नक्की काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात अनेक जण असल्याचे म्हटलं जात आहे तसे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत. आज जर पाहिलं तर सकाळपासून अजित पवार यांना अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या कराड आणि सातारा दौऱ्याला देखील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

ज्याप्रमाणे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीत सुद्धा दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे कुठला नेता कुणासोबत जाणार याची देखील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज अजित पवारांच्या निवासस्थानी केल्या आहेत. त्यानंतर त्या आता चालू असलेल्या अजित पवारांच्या पत्रकार परिषदेला सुद्धा हजार आहेत. त्यामुळे त्या आता अजित पवारांसोबत असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं म्हंटल जात आहे. पण याविषयी त्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही आहे.


हे हि वाचा...


रुपाली चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड...

https://www.maxwoman.in/political/rupali-chakankar-with-ajit-pawar-1230208


Updated : 3 July 2023 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top