Home > Political > "माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका" ; पीडित मुलीची ही मागणी स्वागतार्ह

"माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका" ; पीडित मुलीची ही मागणी स्वागतार्ह

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पित्याकडून अत्याचार झालेल्या पीडितेने आपल्या नावापुढील नराधम पित्याचे नाव काढून टाकण्याची मागणी केली आहे. या मागणीचे राष्ट्रवादीच्या नेत्या रूपालीताई चाकणकर यांनी स्वागत केले आहे.

माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका ; पीडित मुलीची ही मागणी स्वागतार्ह
X

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पित्याकडून अत्याचार झालेल्या पीडितेने आपल्या नावापुढील नराधम पित्याचे नाव काढून टाकण्याची मागणी केली आहे. या मागणीचे राष्ट्रवादीच्या नेत्या रूपालीताई चाकणकर यांनी स्वागत केले आहे.वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात 1 ऑगस्ट 2017 साली एका नराधम पित्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेनं संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता या पीडित मुलीने आपले वय 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर आपल्या नावासमोर नराधम बापाचे नाव काढून टाकण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपालीताई चाकणकर यांनी पीडित मुलीची ही मागणी स्वागतार्ह आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस या स्वाभिमानी मुलीच्या पाठीमागे ठामपणे उभी असल्याची अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच बायकोच्या नावापुढे नवऱ्याचे नावं असावं, मुलीच्या नावापुढे बापाचे नावं असावं असा कोणताही कायदा नाही ती केवळ परंपरा आहे.

त्यामुळे या पीडीत मुलीने जिल्हास्तरीय घरगुती हिंसाचार प्रतिबंध अधिकाऱ्यांकडे आपली मागणी करावी आणि स्थानिक एनजीओने देखील तीला मदत करावी असं आवाहन रुपालीताई चाकणकर यांनी केले आहे. देवळी तालुक्यातील ही घटना बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. या घटनेनंतर नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. मात्र, पीडित मुलीने आपल्या नावापुढे नराधम बापाचे नाव लावू नये अशी मागणी केली आहे. तिच्या या मागणीबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस देखील तिला सर्वेतोपरी मदत करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले आहे. पीडित मुलीनी जो धाडसी निर्णय घेतला आहे तो निश्चित समाजातील अशा पीडित मुलींसाठी प्रेरणादायी आहे. अशा पध्दतीने नराधम पित्याचे नाव हटवल्याने मुलीला मिळणाऱ्या वडीलोपार्जित हक्कांपासून तिला वंचित ठेवता येत नाही. तिचे हक्क आणि तिला मिळणार संरक्षण हे कायद्याने अबाधित रहाते त्यामुळे वर्धा येथील या मुलीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.


Updated : 29 July 2021 4:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top