Latest News
Home > Political > हातात सिगारेट असलेल्या तेजस्विनी पंडित यांच्या पोस्टवर रुपाली चाकणकर यांनी आक्षेप...

हातात सिगारेट असलेल्या तेजस्विनी पंडित यांच्या पोस्टवर रुपाली चाकणकर यांनी आक्षेप...

हातात सिगारेट असलेल्या तेजस्विनी पंडित यांच्या पोस्टवर रुपाली चाकणकर यांनी आक्षेप...
X

प्लॅनेट मराठी निर्मित 'अनुराधा' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा हातात सिगारेट असलेलं पोस्टर पुणे शहरात सर्वत्र लावण्यात आले आहे. या पोस्टवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे.

या फलकामुळे समाजात धुम्रपानाचे समर्थन आणि अंग प्रदर्शन असा चुकीचा संदेश जात असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून समाजमाध्यमांवर उमटत आहे. या फकला बाबत दिग्दर्शकांनी त्या पाठीमागील उद्देश आणि भूमिका स्पष्ट करावी आशा प्रकारची नोटीस रूपाली चाकणकर यांनी पाठवली आहे.

मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही 'बॅन लिपस्टिक' अशी एक मोहीम काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रींनी केली होती. बँड लिस्टीप असा संदेश देत त्यांनी ही मोहीम चालवली होती. पण त्यानंतर त्या हे सर्व 'अनुराधा' या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी करत असल्याचं समोर आलं. या सिरीजचा जेव्हा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रेक्षकांच्या त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता ही वेबसिरीज पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

Updated : 2021-12-28T20:23:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top