Home > Political > प्रवीण दरेकरांच्या विरोधात रुपाली चाकणकरांची पोलिसात तक्रार

प्रवीण दरेकरांच्या विरोधात रुपाली चाकणकरांची पोलिसात तक्रार

प्रवीण दरेकरांच्या विरोधात रुपाली चाकणकरांची पोलिसात तक्रार
X

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar )यांनी पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी शिरुर इथे एका कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुके घेणार पक्ष' असं वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केलं आहे.

तर यावेळी भाजपवर टीका करतांना चाकणकर म्हणाल्यात की, गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील एकतेला आणि उज्ज्वल परंपरेला नख लावायचं काम करत आहे, सातत्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करता येईल, याकडे त्यांचं जास्त लक्ष आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खलाची पातळी भाजपाने गाठली आहे. भाजप हा वैयक्तिक स्वार्थासाठी, सत्तेच्या लालसासाठी ज्या पद्धतीने खालच्या पातळीचं राजकारण करत आहे, त्यांनी आतापर्यंत कळस गाठलेला आहे, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Updated : 22 Sep 2021 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top